रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ, नवी मुंबई

सन्माननीय बंधू भगिनींनो !

कोकण ....... आपला कोकण एखाद्या पाश्चात्य देशातील निसर्गरम्य ठिकाणाला लाजवेल असा कोकण, काय नाही कोकणात, संपन्नता, विविधता आणि प्रसन्नता हे कोकणाचे आत्मे आहेत. देशात अनेक राज्यातील शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. राज्यातील काही प्रांतात हि भयानकता आजही कायम आहे पण कोकणात या दुःखाचा लवलेश नाही. याचा अर्थ कोकणात दुःख नाही असा होत नाही. कोकणच्या काही भागात पाचवीला पुजलेले दुःख आहे. पण त्या दुःखातही कोकणी माणूस समाधानी आणि आनंदी असल्याचे दिसून येतो. म्हणूनच 'आल्याचे सुख नाही आणि गेल्याचे दुःख नाही' अशा शब्दात पु. ल. देशपांडे कोकणी माणसाचे मोठे समर्पक वर्णन करतात .

अधिक माहिती

उपक्रम

Sponsorship